Saturday, October 24, 2009

पवनी

काही दिवसांपूर्वी भंडाऱ्याला गेलो होतो. तिथून जवळ एक पवनी म्हणून एक गाव आहे, वैनगंगेच्या काठावर. तिथे जातांना धानाची शेतं लागतात. चिनोर नावाच्या तांदळाचा वास भरून घायला छाती लहान पडते.



पवनीला अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी एक वैनगंगेचं. जीवनदायी नदीची रोज पूजा होते तिथे. अनेक घरांना लागून लहान लहान देवळं. नदीचं विशाल पात्र सूर्यास्तानंतर बघण्यासारखं असतं.