Saturday, September 12, 2009

एक न काढलेला फोटो

आज सकाळी फिरून परत येत होतो. पाषाण जवळ असणाऱ्या सोमेश्वरवाडी नावाच्या भागाला जो रस्ता पाषाणला जोडतो तिथे खूप सारं नवं बांधकाम सुरु आहे. एका अर्धवट बांधून झालेल्या टोलेजंग इमारतीसमोर एक सिमेंट मिक्सरच्या चाकावर एक लहान मळक्या कपड्याचं पोरगं बसलं होतं.

परफेक्ट फ्रेम होती फोटोसाठी. माझ्याकडे माझ्या नवीन फोन मधला कॅमेरा होतं. 3.2 मेगापिक्सेल. मी लगेच कॅमेरा बाहेर काढला. बरोबर त्या मुलाच्या समोर उभा राहिलो, असा की मागे सगळ्या मोठ्या इमारती दिसतील. 'भांडवलावाद्याच्या एक्सप्लॉयटेटिव' कृत्यांना हायलाईट करावं म्हटलं. फोटोग्राफीचे नियम लक्षात घेऊन फ्रेम लावण्याचा प्रयत्न केला. कॅमेरात बघत होतो तेव्हड्यात तिथे एक बाई येऊन उभी राहिली. त्या मुलाची आई असावी बहुतेक. तिच्या खांद्यावर अजून एक लहान मूल होतं. ती माझ्याकडे रागाने पाहात होती. नंतर लक्षात आला की ती गरोदर आहे. पोटात अजून एक बाळ.

माझ्या अंगावरून सर्रकन काटा आला. आपण काय करतो आहेत लक्षात आलं. नवीन कॅमेरा, पेपरमधली नोकरी करत असल्यामुळे आलेला माज क्षणात उतरला. जोसेफ पिंटो सरांचे तास, राजेंद्र महामुनी सरांचे फोटोजर्नालिझम तास आठवले. एक मैत्रिणीने 'पत्रकारितेतली मूल्यं फक्त वर्गापुरतीच असतात का?' असा विचारलेला प्रश्न आठवला. त्या गरिबीला ग्लोरिफाय करून मी माझी संवेदनेची गरिबी त्या फोटोतून लोकांना दाखवत फिरणार होतो.

आणखी एक 'फ्रेम' आता बदलावी लागणार होती...

11 comments:

  1. ही जाणीव महत्त्वाची आहेच, पण तो फ़ोटो लोकांसमोर येणं तेवढंच महत्त्वाचं नाही का? बरखा दत्त होऊन हुंदके बाजारात आणू नयेतच. पण गरीबीचं असंवेदनशील उदात्तीकरण टाळूनही विरोधाभासाचं वास्तवदर्शी चित्रण कुणीतरी करायला हवंच ना? तुमच्या मनातली बोच स्वाभाविक आहेच. पण तुम्हांला दिसत असणारा विरोधाभास जगापुढे आणण्याचा प्रयत्न ही बोच टाळण्याच्या यत्नात हरवून जाऊ नये, एवढीच इच्छा!

    ReplyDelete
  2. @a Sane man तुमचं म्हणणं खरं आहे. मी या पोस्टमध्ये, त्या वेळी माझ्या मनात जे काही आलं ते लिहिलेलं आहे. जे आहे ते कसं दाखवायचं यावरून होणारे वैचारिक वाद न संपणारे आहेत. पण आपण असलेल्या चौकटीत राहून आपल्याला दिसलेलं, उमजलेलं लोकांपर्यंत नेणं हे आपण सगळे मधयम हातात असणारे करो शकतो.
    तुमची प्रतिक्रिया नक्कीच उत्साहवर्धक आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. आणखी एक 'फ्रेम' आता बदलावी लागणार होती..


    hmmm...

    ReplyDelete
  4. Thank you, Sushant: for keeping your conscience alive.

    I am happy to note that your conscience still speaks to you and that you still care to listen to that quiet voice that speaks to each of us.

    As long as you listen to your conscience, you will remain alive and there is little to fear: "To thine own self be true. And then thou canst not be false to any man." said Shakespeare.

    Peace and love,
    - Joe.

    ReplyDelete
  5. If every one starts thinking the same, the news will never be reported as news!!!News will be like Ekta kapoors serial characters., every thing goody goody...
    I might be wrong, but just writting the way i felt..

    ReplyDelete
  6. @kayvatelte. First of all for writing what you felt. A blog is all about that.
    The dilemma here was not whether to report it not. But about how to tell this to people. Certainly not by giving photo of that boy and then asking readers to pity at it.

    ReplyDelete
  7. छान लिहलंय. मनाची होणारी हि अवस्था खरंच बोचणारी असते.

    ReplyDelete
  8. jabardast post. tumachya manachi avastha samaju shakato. asha paristhitimadhye mihi phoTo kaDhala nasata.

    ReplyDelete
  9. निश्चितच मी खूप उशीरा वाचतेय हे..पण वाचताना ही शहारा आला अंगावर..
    लिहिलं देखील खूप सुंदर आहे!

    अशाच जबाबदार पत्रकारितेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

    ऋजुता!

    ReplyDelete