Thursday, February 18, 2010

प्रसन्न

माझे एक सिनिअर कलीग,
म्हणत होते घर रंगवायला काढलं आहे.
कैक वर्षात भिंतींना रंगाचा हात लागला नव्हता.




सध्या सगळा संसार आमचा एकाच खोलीत असतो
कधी बेडरूम मध्ये फ्रीज तर कधी बाल्कनीत स्वयंपाक असतो
घरात असतांना सारखा नाकात रंगाचा वास जात असतो


हो, पण आता प्रसन्न वाटतं आहे सगळं, refreshing ही


रेहेमीच प्रसन्न असणारे आज आणखीनच खुललेले दिसले.
म्हणाले 'चल, चहा पिऊन येऊ.'
रंग लावताना येणाऱ्या अडचणी सांगून खळखळून हसत होते.


मनात आलं, अशीच लोकं हवीत आजूबाजूला
प्रत्येक क्षण समरसून जगणारी.

5 comments:

  1. खरं आहे. तथाकथित मेन स्ट्रीम माध्यमांची इतकी फालतू बंधनं असतात. शब्दमर्यादा, सुरुवात हवी, चांगला शेवट हवा, news value हवी, चालू घडामोडीशी निगडीत हवी...अरेरे...इकडे बरं असतं. मी हे लिहिलं आहे. वाचायचं असेल तर वाचा..नाहीतर जा तेल लावत..

    ReplyDelete
  2. asha gosti tar vachayalach havyat karan tya ek khyan pakadoon tumachya hatat detat to khyan aani tya velachi bhavana sarech asha post madhun pakadata yete

    ReplyDelete
  3. सुशांत, तुझी ही कमेंट फेसबुक वर असती तर लाईक नक्की केलं असतं. feeling same :)

    ReplyDelete
  4. खरंय... जिवंत असणे आणि जगणे... यांतला फरक अशी माणसं जाणवून देतात...

    ReplyDelete