Sunday, April 25, 2010

शाळा माझी, तिची

(एक कथा)


काही दिवसांपूर्वी facebook वर
एका शाळेतल्या मैत्रिणीला add केलं
एकाच तुकडीत होतो आम्ही.
१०-११ वर्षाची gap मोठी असते तशी
पुरेशीही, अपुरीही, माणूस बदलायला


कॉफी प्यायला भेटू म्हणाली
मी म्हणालो जेवायलाच भेटू
जास्त वेळ बोलता येईल, म्हणून
शाळेत बरंच काही बोलायचं असायचं
शाळेतली आणि आताची gender logics वेगळी होती.


एका हॉटेलच्या roadside space मध्ये बसलो होतो
म्हणाली, इथे फार धूळ आहे, आत जाऊ
'शाळेत असताना मैदानात मातीत बसून डबे खाल्ले होते.'
मी आठवण करून दिली. नुसता उच्छ्वास टाकून 'हो' म्हणाली
शाळेचा विषय काढला की काहीच बोलायची नाही


निघतांना विचारलं, 'काय झालंय? शाळेबद्दल बोलणं का टाळत होतीस?'
म्हणाली, 'तुझी शाळा आणि माझी शाळा वेगळी होती.'
माझी शाळा तुझ्या शाळेइतकी रम्य वगैरे नव्हती,
आठवण काढण्यासारखी तर मुळीच नव्हती, त्रास होतो आठवल्यावर'


गाडीला किक मारली, काठोकाठ डबडबलेल्या डोळ्यातून हसली, निघून गेली.

13 comments:

  1. आपल्या शाळेची कथा आवडली , काही नाती अशी असतात की ती शब्दात बांधता येत नाही .
    ~ ब्लोग्गेर्स मार्गदर्शक

    ReplyDelete
  2. सुशांत, तुझी शाळा छान आहे. एकाच ठिकाणाबद्दलच्या आपल्या आठवणी वेगवेगळ्या असू शकतात, याची जाणीव लख्खपणे होते. हे व्यक्ती, नाती, काळाबद्दलही होतं.
    - संजय तांबट

    ReplyDelete
  3. sushant,changle lihitos. tuze profile ani aavad vachun tuza perspective samjun aala.

    ReplyDelete
  4. कुळकर्णी......लिवा काय तरी .........!!

    ReplyDelete
  5. कुलकर्णी शाळा कुठली आपली...? लय भारी लिवलंय.....पुण्यात राहिलेल्या पोरी क्या जाने शाळा चीज ही क्या?

    ReplyDelete
  6. कुलकर्णी शाळा कुठली आपली...? लय भारी लिवलंय.....पुण्यात राहिलेल्या पोरी क्या जाने शाळा चीज ही क्या?

    ReplyDelete
  7. कुलकर्णी शाळा कुठली आपली...? लय भारी लिवलंय.....पुण्यात राहिलेल्या पोरी क्या जाने शाळा चीज ही क्या?

    ReplyDelete
  8. Mast. shaletly athavani- kahi sathvaychya tar kahi wisarun jaychya!

    ReplyDelete
  9. वाह !
    मनापासून मनापर्यंत थेट...
    कुठेच अडखळणे नाही...
    भावपूर्ण अर्थवाही...
    क्लायमॅक्स मधला धक्कातंत्र सुन्न करून गेला !

    मस्त लिहितोस यार !!

    - नीरज

    ReplyDelete
  10. khupach chan lihila aahet sushant ...mi tar fan jhale tumchi

    ReplyDelete
  11. Mitra chan lihbitos. :)
    tujha he anga mahit navta mala!

    ReplyDelete
  12. अरे सुशांत, खूपच साध्या प्रसंगातून स्थळ - कालातीत अर्थ व्यक्त करणारी कविता आहे. ज्याचा प्रत्येक माणसाशी संबंध प्रतीत होतो. छान.

    ReplyDelete